सन १९९९ पासून हि सोसायटी सुरु झाली असून , १४५ फ्लॅट धारकांची मिळून असलेली हि सोसायटी आहे . सोसायटीतले सर्वच सभासद एकमेकांशी अगदी एका परिवाराप्रमाणचे वागतात . विविध जाती , धर्म , परंपरांचे पाईक असलेले येथील रहिवासी सर्वच सांस्कृतिक , सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात पुढाकार घेतात.